Home > News Update > मोठा निर्णय : नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठा निर्णय : नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठा निर्णय : नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
X

आरे च्या आंदोलनात सहभागी झाले म्हणून मागच्या सरकारने ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले व तुरुंगात डांबले त्या सगळ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच दिले होते. त्यानंतर आज नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध होता. या प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर तत्कालिन सरकारने गुन्हे दाखल केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घेताच मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि आज नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

Updated : 3 Dec 2019 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top