“सुशांत सिंहच्या आत्महत्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव”

Courtesy: Social Media

अभिनेत सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन सध्या बिहार पोलीस आणि मुंबईत पोलीस यांच्या वाद निर्माण झाला आहे. बिहारमध्ये सुशांत सिंहच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहे.

पण मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. एवढेच नाही तर, “ सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासात काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असल्याने ते या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस जनतेला कसे तोंड देणार?”, असा आरोप मोदी यांनी केला आहे.

दरम्यान शनिवारी बिहार पोलिसांनी मुंबईत दिग्दर्शक रुमी जाफरी यांचा जबाब नोंदवला. जाफरी हे सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्तीच्या संपर्कात असल्याने त्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत तपासात काय समोर आले आहे याची माहिती मात्र बिहार पोलिसांनी दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here