Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता
X




राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मानेचं दुखणं बळावल्यानं ते आज रुग्णालयात दाखल झाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी राज्यातील जनतेला एक संदेश दिला आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली असून जनतेला देखील कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी

माझ्या बांधवांनो भगिनींनो, आणि मातांनो

जय महाराष्ट्र!

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !

पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Updated : 10 Nov 2021 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top