Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल
X

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याच्या त्रास जाणवत असल्याने ते आज गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. जवळपास दिवाळीपासून मुख्यमंत्री ठाकरे यांना हा त्रास प्रकर्षाने सुरु झाल्याचं कळंतय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एच एन रिलायन्स रुग्णालयातील 19 व्या मजल्यावरील विशेष कक्षात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांवर वरिष्ठ आर्थो सर्जन यांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

मुख्यमंत्र्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतरच मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या विशेष कक्षात तेजस ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे आहेत. तर कक्षाबाहेर मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सुरक्षा रक्षक तैनात आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी येणार असल्याचीही माहिती मिळतेय.

Updated : 11 Nov 2021 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top