पोलीसांच्या बदल्या रद्द! सरकारमध्ये काय चाल्लंय काय? रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

उद्धव ठाकरे यांच्या सरकार मधील प्रशासन स्तरावर असलेला गोंधळ स्वत: मंत्री समोर येऊन सांगत आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी कोरोनाच्या काळात झालेला गोंधळ मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितला होता. राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय़ मेहता मंत्र्यांचं ऐकत नाहीत. अशी थेट तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मंत्री करत होते. तरीही मुख्यमंत्र्यांचं यावर कुठलंही भाष्य आलं नाही.

मुंबई मध्ये कोरोनाची साथ वाढलेली असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आय.एस. चहेल यांची नेमणूक करण्यात आली. आता

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली एका दिवसांत रद्द झाल्यानंतर आता उध्दव ठाकरे सरकारने दहा पैकी 8 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात माहिती देताना मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी केलेल्या अंतर्गत बदल्या रद्द करण्यात आल्याचं सांगितले आहे. अनिल देशमुख यांनी केवळ बारा सेकंदाची ही प्रतिक्रिया दिली आहे. पण या प्रतिक्रियेमधून सरकारमधील विसंवाद पूर्णपणे समोर आलेला आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी केलेलं विश्लेषण पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here