Home > News Update > शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार – मुख्यमंत्री

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार – मुख्यमंत्री

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी राजीनामा देण्यास तयार – मुख्यमंत्री
X

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, पण ज्यांनी मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला.

कुणाकडे किती संख्या आहे हा विषय आपल्यासाठी गौण आहे. पण ती संख्या तुम्ही कशी जमवता, यालाही महत्त्व आहे. माझ्याविरोधात अविश्वास ठराव येण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच काही आमदार हे आपल्या संपर्कात असून त्यांना परत यायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती, तसेच काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आले असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. " मुख्यमंत्रीपदी मी नको असेल तर तसे मला स्पष्ट सांगा, येऊन सांगा किंवा फोनवर सांगा" असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आण राष्ट्रवादीने मला विरोध केला असता तर वाईट वाटले नसते, पण माझ्याच लोकांनी मला विरोध केला आहे, याचा धक्का बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अट घातली, त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्याशी येऊन का बोलला का, नाहीत? असेही त्यांनी म्हटले आहे.

मी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार पण ज्यांना मी नको आहे, त्यांनी माझ्यासमोर येऊन तसे सांगावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. एवढेच नाही तर भाषण संपताच आपण आपला मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जे आमदार गायब आहेत त्यांनी येऊन माझ्या राजीनाम्याचे पत्र राजभवनावर न्यावे, कारण आपल्याला कोरोना झाला आहे. एवढेच नाही तर जर मी राज्य आणि पक्ष चालवण्यास नालायक आहे असे शिवसैनिकांनी सांगितले तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यासही तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी नेमके काय म्हटले?

माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह. बोलण्यासराख बरेच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाहि अश्या परिस्थितीत मला.जे कराचे ते प्रश्न प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून होया.

माध्यमात अनेक अफवा. मी भेटूत नव्हतो हे काहि दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री.

ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्ुअत आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने.

आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हाॅटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने पूर्ण करणारा. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली .नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत.

धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.

कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

जय हिंद जय महाराष्ट्र

Updated : 22 Jun 2022 2:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top