Home > News Update > मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
X

आज मुंबई सह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.

यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना साडेतीन हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती दिली.

तसंच यावेळी त्यांनी मुंबईत कुठंही पाणी साचल्याच्या घटना नाहीत असा दावा केला. तसंच हिंद माता जिथं पाणी साचत तिथं पाणी साचलेलं नाही. धोकादायक इमारती नागरिकांनी खाली कराव्यात. अशी सूचना त्यांनी नागरिकांना केली आहे. तसंच सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्याची माहिती दिली.

Updated : 5 July 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top