Home > News Update > महाराष्ट्रात थंडीचा कडाका

महाराष्ट्रात थंडीचा कडाका

संक्रांतीदरम्यानच्या या काळात थंडी जाणवणार असली तरी सध्या 17 ते 21 जानेवारी पर्यंतच्या पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. मान्सून बाहेर जाऊन थंडी आत आली आहे.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका
X

सध्याच्या कालावधीत पीकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा आणि जमिनीच्या वर पिकांना निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्यासाठी मकर संक्रांतीदरम्यान स्वच्छ सूर्यप्रकाश हवा असतो. सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसून रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके आणि इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नसल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. या कालावधीत ही रब्बी पिके फलधारणेच्या म्हणजे दाणाभरण्याच्या अवस्थेत तर काही हुरडा अवस्थेत आहेत. म्हणून तर या म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळ्याविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्वाचा मानला जातो. तो सूर्यप्रकाश सध्या मिळतो आहे.

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची शेतात साजरी होणारी ' येळ '(वेळ) अमावस्या ह्याच कालावधीत येते. नवीन येणाऱ्या धान्यांची, अन्नाची पूजा केली जाते. शास्त्रीयदृष्ट्याही ह्या कालावधीला महत्व आहे. ह्या कालावधीतील सकाळच्या वेळेस हवेत ऑक्सीजनचे प्रमाण अधिक तर ओझोनचा थर अतिशय शुद्ध असतो. म्हणून तर आहार- विहार जाणीवपूर्वक केला जातो. त्या दिवसानंतर म्हणजे मकर संक्रांतीनंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्धातील भाग हळूहळू सूर्यापासून दूर तर विषववृत्त ओलांडून उत्तर गोलार्धातील भाग पुन्हा सूर्यासमोर अधिक येणे म्हणजेच पृथ्वीचे उत्तरायण चालू होते. यामुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

Updated : 18 Jan 2024 7:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top