Home > News Update > मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार ; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार

मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार ; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार

मुंबईतील शाळांची घंटा उद्याच वाजणार ; पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार
X

मुंबई // राज्यातील कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्यानंतर 1 डिसेंबरपासून ऑफलाईन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबत आदेश जारी केलेत.

मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यात तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे महापालिका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काही शाळांना याविषयीची माहिती मिळाली नसल्याने त्या पुन्हा सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी आज सकाळी एक आढावा बैठक बोलावण्यात आली असून त्यात राहिलेल्या त्रुटींवर तातडीने मार्ग काढले जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी सांगितले.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या ओमीक्रोन या व्हेरीएटमुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही, याबाबत सांशकता ही पालकांमध्ये व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका शिक्षण विभागाने मुंबईतील शाळा आपल्या नियोजित तारखेनुसार सुरू होणार असल्याचे स्पष्ट केलंय. शाळेत आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी पालकांनी आपले संमतीपत्र देणे आवश्यक आहे.

दरम्यान महापालिकेच्या आदेशानुसार शाळा व्यवस्थापनाची वर्ग सुरु करण्याची तयारी आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दोन बॅचेसमध्ये शाळेत बोलवावं लागणार आहे.तर, काही ठिकाणी ओमिक्रॉनच्या धसक्यानं विद्यार्थ्यांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाहीये. काही पालक अजूनही ऑनलाईन क्लासेस सुरु ठेवण्याच्या मानसिकतेत असल्याचे काही शाळाप्रमुखांनी सांगितलं आहे. कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरु केल्यास स्कुल बसचा खर्च देखील वाढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर काही पालकांनी शाळा नव्या वर्षात सुरु करावी, अशी भूमिका घेतली आहे.

Updated : 14 Dec 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top