Home > News Update > पहिली ते चौथीचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता ; शिक्षणमंत्री अनुकूल

पहिली ते चौथीचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता ; शिक्षणमंत्री अनुकूल

पहिली ते चौथीचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता ; शिक्षणमंत्री अनुकूल
X

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असल्याने आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक मंत्री गायकवाड यांनी घेतली. यावेळी सर्वच अधिकाऱ्यांनी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याची विनंती केली. दरम्यान पाचवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांमध्ये विद्यार्थी येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही अधिकाऱ्यांनी वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले नसले तरी चौथीपर्यंतचे विद्यार्थी शाळांमध्ये येऊन बसत आहेत. त्यांना शिकवले देखील जात असल्याचे सांगितले.

लातूरचे सीईओ अभिनव गोयल यांनी यावेळी 'मिशन बाला ५००'ची माहिती दिली. ज्यात लोकवर्गणीतून आनंददायी वातावरण शाळांमध्ये तयार करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने ओट्यावरची शाळा हा उपक्रम राबवून कोरोना काळातही प्रत्यक्ष शिक्षण सुरू ठेवले असल्याची , माहिती सीईओ लीना बनसोड यांनी दिली. या जिल्हा परिषदांनी राबविले अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असताना त्यांची दुरवस्था झाली होती. शासकीय यंत्रणा, लोकवर्गणी, शाळा समित्यांच्या सहकार्याने त्या नीट, स्वच्छ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्या सर्व शाळांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे, असं सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

Updated : 23 Oct 2021 2:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top