Home > News Update > नागपूर शहरात आजपासून सुरू होणार इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग

नागपूर शहरात आजपासून सुरू होणार इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग

आज गुरुवारी 16 डिसेंबरपासून नागपूर शहरात शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश दिलेत

नागपूर शहरात आजपासून सुरू होणार इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग
X

नागपूर // 1 डिसेंबर 2021 पासून नागपूर महापालिका क्षेत्रामधील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज गुरुवारी 16 डिसेंबरपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केलेत.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या मनपाच्या 116 शाळांसह 1053 खासगी शाळा अशा एकूण 1069 शाळा आज सुरू होतील. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये असलेल्या 1069 प्राथमिक शाळांमध्ये एकूण 2 लाख 49 हजार 715 विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये 9319 विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये 2 लाख 40 हजार 396 एवढी विद्यार्थी संख्य आहे. प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पालन करणे आवश्यक आहे.

नागपूर शहरातील शाळा सुरू करताना वर्गात किंवा अन्य परिसरात दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, प्रत्येकाने फेस मास्क, फेस कव्हर वापरणे बंधनकारक आहे , तसेच वारंवार हात धुणे आवश्यक आहे. वर्गामध्ये विद्यार्थीसंख्या जास्त असल्यास दोन शिफ्टमध्ये शाळा घेणे, एका बाकावर एक विद्यार्थी बसविणे , दोन बाकांमध्ये 6 फुट अंतर , एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत अशी व्यवस्था करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोसचे कोव्हिड लसीकरण आवश्यक आहे. शिंकताना, खोकताना स्वत:चे तोंड व नाक हात रूमाल टिश्यू पेपर अथवा दुमडलेल्या हाताच्या कोपराने झाकावे. वापरलेल्या टिश्यू पेपरची विल्हेवाट आरोग्यदायी रितीने लावण्यात यावी. कोणतीही लक्षणे असल्यास वेळेत त्याची माहिती द्यावी व उपचार करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे.

Updated : 16 Dec 2021 1:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top