Home > News Update > रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
X

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत असले तरी रायगडमध्ये मात्र आघाडीत बिघाडी असल्याचे दिसून आले आहे. रायगडमध्ये लॉकडाऊन असतानाही शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. एका आंतरराष्ट्रीय कंपनीतील भंगाराच्या वादातून कंपनीच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना समोरासमोर भिडले असल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये दोन गटात हाणामारी झाल्याचे दिसते आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांना यात धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. निजामपुर येथे असलेल्या पोस्को स्टील आंतरराष्ट्रीय कंपनीतील भंगार कोणी उचलायचे या कारणावरून बरेच दिवस वाद धुमसत होता. त्यासाठी कंपनीने ओपन टेंडर काढले होते. यासाठी अनेक महिने आंदोलने देखील सुरु होती. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. या घटना स्थळावर पोलीस जरी दाखल जरी झाले होते गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या वादात दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.

Updated : 27 April 2021 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top