Home > News Update > 'महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?'- वाघ

'महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?'- वाघ

महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं  महाराष्ट्र बंद?- वाघ
X

पुणे : पुण्यात अल्पवयीन कबड्डीपटूची एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.'महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद?' असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अतिशय भयानक... काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय, काय भोगलं असेल तीने कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर..पोलिस कायदे कागदावर असं चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थीनीच्या हत्येची अत्यंत निंदनीय घटना समोर आली आहे. दरम्यान या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त करत, आरोपींना कठोरतील कठोर शिक्षा होईल असं म्हटलं आहे.

Updated : 13 Oct 2021 3:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top