Home > News Update >  मोठी बातमी: अखेर चीनची माघार

 मोठी बातमी: अखेर चीनची माघार

 मोठी बातमी: अखेर चीनची माघार
X

भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर निर्माण झालेला तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीला आडमुठी भूमिका घेणाऱ्या चीनने अखेर गलवानमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केलेली आहे. ANI या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलेले आहे.

22 जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये चीनने सैन्य मागे घेण्याचे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे आता या भागात चीनने सैन्य मागे घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि काही प्रमाणात सैन्य मागे देखील बोलावण्यात आलेले आहे. 22 जून रोजी कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी चीनच्या हद्दीतील मॉल्दो येथे जाऊन चिनी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सैन्य मागे घेण्यासंदर्भात एकमत झालं होतं.

15 जून रोजी गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारताच्या 10 जवानांना चीनने ताब्यात घेतलं होतं, पण नंतर सोडून दिलं अशीदेखील माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिलेली आहे. त्याचबरोबर या संघर्षामध्ये चीनचे 43 सैनिक मारले गेल्याचे वृत्त देखील ANI ने दिलेले आहे.

Updated : 25 Jun 2020 2:58 PM GMT
Next Story
Share it
Top