Home > News Update > चीनमध्ये प्रेम करण्यासाठी आठवडाभराची सुट्टी

चीनमध्ये प्रेम करण्यासाठी आठवडाभराची सुट्टी

चीनमध्ये प्रेम करण्यासाठी आठवडाभराची सुट्टी
X

चीन सरकारने कॉलेज तरुणाईला प्रेमात पडण्यासाठी आठवडाभराची सुट्टी जाहीर केली आहे. चीनमध्ये घटता जन्मदर (Decrease Birth Rate) चिंतेचा विषय बनला आहे. त्यापार्श्वभुमीवर चीनमध्ये (China) कॉलेज तरुणांना आठ दिवस प्रेमात पडण्यासाठी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जन्मदर वाढण्यासाठी मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात एनबीसीने बातमी दिली आहे.

एनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार मीनयांग फ्लाईंग व्होकेशनल कॉलेजने (Mianyang Flying Vocational College) पहिल्यांदाच 21 मार्चला स्प्रिंग ब्रेकची घोषणआ केली. यामध्ये 1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांना प्रेमात पडण्यासाठी प्रोत्साहन (Encouraged to Fall in Love) देण्यात येणार आहे. निसर्गाशी प्रेम करणे, जीवनाशी प्रेम करणे आणि आयुष्यातील जोडीदारावर प्रेम करण्यासाठी आठ दिवसांचा स्प्रिंग ब्रेक देण्यात आला आहे.

आम्हाला विश्वास आहे की, विद्यार्थी हिरवं पाणी आणि हिरवा निसर्ग पाहण्याचा आनंद घेतील, असं या या कॉलेजच्या उप कुलगुरू यांनी म्हटलं आहे. मात्र चीनमध्ये देण्यात आलेल्या या प्रेमात पडण्याच्या सुट्ट्यांची भारतात जोरदार चर्चा रंगली आहे.

Updated : 2 April 2023 5:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top