Home > News Update > मुख्यमंत्र्यांची आज गृहनिर्माण आढावा बैठक...

मुख्यमंत्र्यांची आज गृहनिर्माण आढावा बैठक...

मुख्यमंत्र्यांची आज गृहनिर्माण आढावा बैठक...
X

मुंबईत रहाणे परवडत नाही अशा तक्रार अनेक जणांच्या असतात त्यामुळे मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबईपुरता घरांचा साठा पुरविण्यात म्हाडा प्राधिकरण अपयशी ठरत आहे. शहरातील नव्याने विकसीत होणाऱ्या प्रकल्पांची गतीही थंडावली आहे. म्हाडाप्रमाणेच खासगी स्तरावर पुनर्विकास प्रकल्प मागे पडले आहेत.

रखडलेले गृहप्रकल्प, नव्याने विकसीत होणारे प्रकल्प थंडावले असून प्रकल्प, घरांची घटलेली मागणी यामुळे मुंबईकर मोठ्या संकटात सापडला आहे. झोपडपट्टी पुर्नवसनाच्या मंदावलेला वेग हा आणखीनच घरांच्या समस्येत भर पाडत आहे. आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहात गृहनिर्माण विभाग आढावा बैठक घेत आहेत. बैठकीत म्हाडा, SRS, शिवशाही पुर्नवसन प्रकल्प, धारावी पुर्नवसन प्रकल्प (DRP) अन्य विभागांचा समावेश आहे. त्यात विविध रखडलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा...

‘जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्या वर ‘माफी- मुक्ती’ चे तुकडे फेकू नका’

जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे जागतिक पडसाद..

कॅबिनेट मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडूनही (SRS) मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाला आहे. एसआरएचे वांद्रे येथील मुख्यालयास कडेकोट किल्ल्याची रचना देण्यात तिथले प्रशासन यशस्वी ठरले आहे. पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविताना त्यांची नाकीनऊ येत आहे. ज्या ठिकाणी योजना राबविल्या गेल्या आहे त्यापैकी काही ठिकाणी असंख्य अडचणींनी रहिवासी त्रासले आहेत. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष आहे.

Updated : 4 Jan 2020 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top