Home > News Update > कांदे-भुजबळ वादाची अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल

कांदे-भुजबळ वादाची अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल

कांदे-भुजबळ वादाची अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल
X

नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशासकीय कागदपत्रे मागवली आहेत, ते यावर ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार सुहास कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप करत याचिका दाखल केली आहे. ही याचिका मागे घ्यावी म्हणून आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा आरोप देखील आमदार कांदे यांनी केला होता. त्यामुळे राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र देत तक्रार केली होती. मात्र, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांचे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत.

दरम्यान आमदार कांदे आणि निकाळजे हे कोणतेही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यास असमर्थ ठरले. हा चौकशी अहवाल पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी स्वतः या दोघांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आमदार कांदे यांचा जबाब घेतला. तर काल सोमवारी अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदवण्यात आला. आता या जबाबानंतर अक्षय निकाळजे यांनी आमदार कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. आमदार कांदे यांच्याकडे आपल्याविरोधात एकही पुरावा नाही. भुजबळ यांच्याविरोधातील खटला मागे घ्यावा म्हणून मी धमकी दिल्याचे वृत्त पूर्णतः खोटे आहे, माझे कांदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले, पण ते आमच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत होते. धमकीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी केलेल्या आरोपाने मला भावनिक त्रास झाला. त्यामुळे मी कांदे यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे, असा इशाराही निकाळजे यांनी दिला

Updated : 9 Nov 2021 12:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top