Home > News Update > मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे येणार एकाच मंचावर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे येणार एकाच मंचावर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे येणार एकाच मंचावर
X

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एका मंचावर येणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमावेळी ठाकरे-राणे एकाच मंचावर येणार आहेत. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी लागलेली वर्णी लागल्यानंतर जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केलेल्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. त्यामुळे राणे विरूध्द शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत चिपी विमानतळ आपल्या प्रयत्नातूनच झाल्याचा दावा केला तर आज शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत चिपी विमानतळ आपल्या प्रयत्नामुळेच सुरू होत असल्याचा दावा केला. त्यानंतर शिवसेना आणि राणे समर्थकांमध्ये चिपीच्या श्रेयवादावरून समाज माध्यमांवर चांगलच राजकारण रंगलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे विमानतळाचं उद्घाटन करतील. त्यामुळे मुख्यमंत्री हवाच असं काही नाही, असं राणे म्हणाले होते. त्यावर विनायक राऊत यांनी आज जोरदार पलटवार केला आहे. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, असं राऊत म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवायचं की नाही याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवाल करत त्यांनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही, पण महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते असे म्हटले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानाशी भाजप असहमत असल्याचेच दिसत आहे.

Updated : 8 Sep 2021 10:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top