Home > News Update > मुख्यमंत्री "चले जाव - घर वापस आव"

मुख्यमंत्री "चले जाव - घर वापस आव"

मुख्यमंत्री चले जाव - घर वापस आव
X

नागपूर मध्ये दोन अनोखे आंदोलन करण्यात आले. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फॅन क्लब ने लोटांगण घालून आणि नंतर गणपती ची आरती करून गणपती ला साकडे घातले की, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करा. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मुख्यमंत्री वापस आव’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन केलं.

१३ दिवस झाले महाराष्ट्राला सरकार मिळत नाही, सर्व सामान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संघटीत ताबडतोब पर्यायी सरकार बसवा यासाठी कारकर्ते आंदोलने करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसचे सरकार यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा मुख्यमंत्री बनवा अशी इच्छा या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Updated : 6 Nov 2019 7:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top