Home > News Update > Chhatrapati Sambhajinagar : अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिस आयुक्तांचे आवाहन

Chhatrapati Sambhajinagar : अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिस आयुक्तांचे आवाहन

Chhatrapati Sambhajinagar : अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिस आयुक्तांचे आवाहन
X

राम नवमी आणि रमजान एकत्रित सण सुरु आहेत. त्यापार्श्वभुमीवर छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा येथे या पवित्र सणाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथे नशेखोर युवकांच्या दोन गटात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर पुढे दंगलीत झाल्याचे पहायला मिळाले.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ऊशीरा 12.30 ते 1 च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोटारसायकलवरून बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर दंगलीत झाले. यामध्ये काही समाजकंटकांनी या संधीचा फायदा घेत या घटनेला हिंसक वळण दिले. त्यात काही गाड्यांची जाळपोळ केली. यामध्ये पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी आवाहन करताना म्हणाले की, पोलिसांनी उत्तमरित्या कामगिरी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केले.

Updated : 30 March 2023 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top