Home > News Update > विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय: छगन भुजबळ

विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय: छगन भुजबळ

विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय: छगन भुजबळ
X

मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली,विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून सुडबुध्दीनं संस्थांचा वापर होतोय असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. कुणी जर स्वप्नरंजन करत असेल तर त्यांना त्या स्वप्नात रंगू दे आपण कशाला त्यांचा स्वप्नभंग करायचा. पाठीमागच्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली.

लोकांना आता माहिती झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय", असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

आता शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मागे "अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसंच कंगनाच्या प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसं वाटलं तसंच घडलं", असं भुजबळ म्हणाले.


Updated : 24 Nov 2020 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top