Home > News Update > चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी

चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी

चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी
X

मान्सूनच्या पावसाचा जोर वाढत असताना आज पहाटे चारच्या सुमारास मुंबईतील चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत झोपडीतील अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. चेंबुरच्या न्यू भारतनगरमध्ये सकाळी ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेली माहितीनुसार आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चेंबुरमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे. चेंबुरमधील झोपडीवर दरड कोसळलेल्या घटनेत दोन भाऊ जखमी झाले आहेत. चेंबुर येथील ही झोपडपट्टी डोंगरी पट्ट्यात भागात येत. याआधीही या विभागात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडून गेल्या आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात म्हणून याअगोदरही प्रशासनाने नागरिकांना येथून स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

चेंबूर च्या आरसीएफ न्यू भारत नगर या डोंगराळ झोपडपट्टी मध्ये दरड कोसळून एक भला मोठा दगड एका झोपडीवर कोसळला.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र या झोपडी मध्ये रहाणारे अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती हे जखमी झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणत डोंगराळ भागात झोपड्या आहेत. दरवर्षी इथे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.ता मुळे इथल्या नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस पालिका देत असते.मात्र इथले नागरिक जाणार तरी कुठे? असा प्रश्न असल्याने मनसेतर्फे इथल्या नागरिकांना सरकार नेच तात्पुरता निवारा देण्याची मागणी मनसे उपाध्यक्ष माऊली खंडागळे म्हणाले.

Updated : 19 Jun 2022 2:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top