Home > News Update > साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल; 18 दिवसांत दोषारोपत्र सादर

साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल; 18 दिवसांत दोषारोपत्र सादर

साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल; 18 दिवसांत दोषारोपत्र सादर
X

मुंबई : मुंबईतील साकीनाका भागातील पाशवी बलात्कार प्रकरणी काल मंगळवारी (28 सप्टेंबर) रोजी मुंबई पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केलं आहे. अवघ्या 18 दिवसांमध्ये सर्व साक्षीपुरावे गोळा करत मुंबई पोलिसांनी 346 पानांचं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

मुंबईत घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र हादरला होता. या घटनेतील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केले होते. दरम्यान पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी दिलं होतं. सोबतच पोलिसांनी तातडीने या घटनेचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.त्यानुसार मंगळवारी मुंबई पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत आपलं आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

346 पानांच्या या आरोपपत्रात , पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती असं नमूद करण्यात आलं असून, गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मात्र यात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केल्याचे दोषारोपत्रात म्हटले आहे.

मात्र, हे कृत्य पूर्वनियोजित नव्हतं असं देखील दोषारोपत्रात नमूद करण्यात आले असून आरोपपत्रात एकूण 77 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात अॅट्रॉसिटी, बलात्कार आणि हत्येशी संबंधित विविध कलमं आरोपीवर लावण्यात आली आहेत.

Updated : 29 Sep 2021 2:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top