Home > Top News > ठाण्यात चरस,एमडी विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ठाण्यात चरस,एमडी विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ठाण्यात चरस,एमडी विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
X

अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने सापळा रचून मिलींद जगदंबाप्रसाद दुबे (४२) याला अटक केली. त्याच्याकडे पोलिसांना ७० ग्राम एमडी आणि २७ ग्राम चरस असा ३ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल सापडला आहे.

अटक आरोपी मिलींद जगदंबाप्रसाद दुबे रा. वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम हा अंमली पदार्थ चरस आणि एमडी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून पोलीसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे संभाजीनगर नाल्याजवळ, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम येथे सापळा रचुन आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७० ग्राम एमडी पावडर आणि २७ ग्राम चरस हे अंमली पदार्थ आढळले. सोबतच आरोपीकडे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा व मोटार सायकल असा ३ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस पथकाने आरोपीच्या विरोधात सरकारच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस पथक अधिक तपास करीत आहेत.

Updated : 11 Aug 2023 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top