Home > News Update > मंत्री बच्चू कडू दोन महिने कारावासाच्या शिक्षेला देणार आव्हान

मंत्री बच्चू कडू दोन महिने कारावासाच्या शिक्षेला देणार आव्हान

शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मंत्री बच्चू कडू दोन महिने कारावासाच्या शिक्षेला देणार आव्हान
X

: विधानसभा निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदुरबाजार न्यायालयाने 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या शिक्षेला मंत्री बच्चू कडू आव्हान देणार आहेत.

2014 साली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शालेय शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुंबई येथील घरावर कर्ज घेतले होते. मात्र त्यासंबंधी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आळी नव्हती. त्याप्रकरणी बच्चू कडू यांना चादुरबाजार न्यायालयाने 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. मात्र या शिक्षेला वरच्या न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

2014 साली विधानसभेची निवडणूक लढवताना बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामध्ये मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवण्यात आली होती. त्याप्रकरणी भाजपचे अचलपुर येथील नगरसेवक तक्रार दाखल केली होती. तर याबाबत आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांना चांदुरबाजार न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला होता. तर त्यानंतर न्यायालयाने बच्चू कडू यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बच्चू कडू प्रतिक्रीया देतांना म्हणाले की, न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला असला तरी मी त्याचे स्वागतच करतो.

याप्रकरणी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राज्य सरकारने आमदारांच्या घरासाठी एक सोसायटी गठीत करून कर्ज गिले होते. त्याच कर्जातून घेतलेले हे घर आहे. मात्र 2014 साली विधानसभा निवडणूकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रतिज्ञापत्रात घेतली होती. मात्र त्यामध्ये घरक्रमांक टाकण्यास विसरलो, ही छोटीशी चुक झाली. मात्र घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम प्रतिज्ञापत्रात दाखल केली होती. या छोट्याशा चुकीबद्दल न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला आहे. मात्र न्यायालयाचा चुकीचा निर्णय असला तरी त्याचा आदरच केला पाहिजे. त्यामुळे न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रीया बच्चू कडू यांनी दिली.

तसेच पुढे बच्चू कडू म्हणाले की, हा निर्णय चांदुरबाजार न्यायालयाने दिला आहे. मात्र याबाबत तक्रार करणारा चांदुरबाजार येथील आहे. तर आशेगावला तक्रार दाखल करण्यात आली होती. पण याप्रकरणातील महत्वाचा भाग म्हणजे एका ठाणेदाराने गरीब माणसाची 20 हजार रुपयांची लुबाडणूक केली होती. त्या ठाणेदाराला आम्ही आमच्या पध्दतीने समज दिल्याने त्याने त्या प्रकाराचा या प्रकरणामध्ये वचपा काढण्यासाठी आशेगावला त्याने तक्रार लिहून घेतली आणि दुसऱ्या एका विरोधकाला हाताशी धरून ही केस निर्माण केली. त्याच केसचा निकाल चांदुरबाजार न्यायालयाने दिला आहे. त्यामध्ये 2 महिने कारावासाची सजा आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे आम्ही वरीष्ठ न्यायालयात जाऊ आणि तिथे आम्हाला न्याय मिळेल, असा आत्मविश्वास आहे असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Updated : 11 Feb 2022 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top