Home > News Update > ओबीसींबद्दल एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे- बावनकुळे

ओबीसींबद्दल एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे- बावनकुळे

ओबीसींबद्दल एवढाच कळवळा असेल तर काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे- बावनकुळे
X

नाना पटोले यांनी मान्य केले की,आमच्या सरकारी वकीलांनी बरोबर न मांडल्यामुळे ओबीसी आरक्षण गेलं आहे,तेव्हा पटोलेंना ओबीसी समाजाबद्दल ऐवढी कळवळ आहे तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा आव्हान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांना भंडारा येथे आयोजित पत्रपरीषदेतून दिलं आहे.

वीज भरण्याची जबाबदारी ही राज्यसरकारची असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले असून गावामधील पाणी आणि विजबिलाचे पैसे राज्यसरकारने भरायचे असतात, असे नियम असताना देखील महाविकास आघाडी सरकार पथदिव्याचे विजबिल न भरता सरपंचाकडून दोन हजार कोटी रुपये लाटण्याचा महाविकास आघाडी सरकारची योजना असल्या आरोप बावनकुळे यांनी करीत केंद्र सरकारने गावाच्या विकासासाठी पाठवलेल्या पैसावर डल्ला मारण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचाही आरोप करून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्र सोडले आहे.

आतातरी मुख्यमंत्र्यांनी बाहेर निघून जनतेच्या समस्या सोडविल्या पाहीजेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता तरी बाहेर निघून राज्यातील 12 कोटी जनतेच्या समस्या सोडविल्या पाहीजेत,कारण हे राज्य महाविकास आघाडी सरकारने 25 वर्ष मागे नेल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Updated : 17 Sep 2021 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top