Home > News Update > दोन दिवस पुरात अडकलेल्या 22 जणांची सुटका

दोन दिवस पुरात अडकलेल्या 22 जणांची सुटका

दोन दिवस पुरात अडकलेल्या 22 जणांची सुटका
X

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर आता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले गेले आहेत. यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगावजवळ दोन दिवसांपासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाहीत.

चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. अखेर मध्यरात्री 2 वाजता सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी मुसळधार पावसात बोटी घेऊन पोलीस पाण्यात उतरले. सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले.

वाहनचालकांमध्ये 6 स्थानीक तर 16 इतर राज्यातील लोक होते. पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत पोलिसांचे आभार मानले. गडचांदूर पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Updated : 14 July 2022 6:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top