Home > News Update > खडसेंच्या उमेदवारीला चंद्रकांत पाटलांचा विरोध

खडसेंच्या उमेदवारीला चंद्रकांत पाटलांचा विरोध

खडसेंच्या उमेदवारीला चंद्रकांत पाटलांचा विरोध
X

माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या राज्याच्या राजकारणापासून दोन हात लांब आहे. त्यांचं मंत्री पद गेल्यापासून ते नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र, आता खडसेंच्या उमेदवारीला शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये शिवसेना – भाजप सामना रंगण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

आता कोणतेच पद नको- एकनाथ खडसे

मुक्ताईनगर हा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ही जागा शिवसेनेसाठी मागितली आहे. जर पक्षांनी ही जागा आपल्याला दिली नाही तर आपण अपक्ष लढणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खडसेंच्या उमेदवारीला का आहे शिवसेनेचा विरोध वाचा:

एकनाथ खडसे परिवारातील उमेदवारीला शिवसेनेचा विरोध

मुक्ताईनगर मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर एकनाथ खडसे यांनी खोटे गुन्हे दाखल केले असून खडसे यांनी नेहमीच शिवसेना संपविण्याची भाषा केली असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील केला होता. यावेळी खडसे परिवारातील उमेदवारीला त्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता खडसेंना विधानसभा निवडणुकीत देखील चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला आहे.

Updated : 30 Sep 2019 1:17 PM GMT
Next Story
Share it
Top