Home > News Update > राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

राज्यात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सातत्याने पडत आहे. यावेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. अनके शेतकरी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट दिली आहे. राज्यांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात पावसाची शक्यता;  हवामान खात्याचा इशारा
X

(Weather Forecast Today) : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सातत्याने पडत आहे. यावेळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनके शेतकरी पावसामुळे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने एक नवीन अपडेट दिली आहे. राज्यांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने नष्ट केला आहे. शेतकरी आता गंभीर अडचणीत आहे. देशाच्या अनेक भागात, गेल्या आठवडाभरापासून वारंवार पाऊस पडत आहे. पाऊस आणि वारा यामुळे काही भागात दव निर्माण झाले असून, लोकांना मार्च महिन्यात थंडी ला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे वातावरणात अनेक बदल झाले आहेत . तापमानात अचानक बदल झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. अनेक आजारांना सामोरे जावा लागत आहेत. त्यामुळे सततच्या हवामानातील बदलांचेही अनपेक्षित परिणाम होतात. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

चक्रीवादळाची शक्यता

भारता शेजारील राष्ट्रातील हवामानाच्या बदलाचा परिणाम हा भारतातही जाणवणार आहे. स्कायमेटच्या मते, अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या परिसरात आता नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा आसपासच्या भागात सक्रिय झाला आहे . आता ते उत्तर भारताकडे वाटचाल करत आहे. समांतर, नैऋत्य राजस्थानमध्ये चक्री वादळ निर्माण होत आहे. त्यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता जास्त आहे. तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, अंतर्गत ओडिशा, रायलसीमा आणि झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र दिसत आहे. त्यामुळे याठिकाणी पावसाची शक्यता बळावली आहे.

आजचे हवामान कसे असेल?

पुढील २४ तासांत पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उप-हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि दक्षिण केरळ या उत्तर भारतातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आग्नेय मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये थोडा पाऊस पडू शकतो. गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. आज दिल्लीत ढगाळ वातावरण राहील. अंदाजानुसार पाऊस पडणार नाही. तर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीठ झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.

Updated : 25 March 2023 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top