Home > News Update > सरदार एकही आदमी था… शरद पवार- छगन भुजबळ

सरदार एकही आदमी था… शरद पवार- छगन भुजबळ

सरदार एकही आदमी था… शरद पवार- छगन भुजबळ
X

राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujabal )यांच्या नेतृत्वात आज मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील पराभुत उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी सभा आजोजित केली होती. या सभेत भुजबळ यांनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना हताश न होता आपण का हरलो आणि खोट्या मतदारांविषयी अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendre fadanvis) यांच्या सध्याच्या मुख्यमंत्री पदासाठी चाललेल्या संघर्षाविषयी बोलताना “निवडणूकीपुर्वी शरद पवारांवर(Shard Pawar) ‘शोले’चा किस्सा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांची स्थिती आता ‘शोलेतल्या सांभा’ सारखी झाली आहे. ‘अरे ओ सांभा कितने आदमी थे…सरदार एकही आदमी था .. शरद पवार” असा टोला लगावला.

Updated : 3 Nov 2019 10:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top