Home > News Update > लसीकरणाबाबत केंद्राचा महाराष्ट्राशी दुजाभाव – राजेश टोपे

लसीकरणाबाबत केंद्राचा महाराष्ट्राशी दुजाभाव – राजेश टोपे

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर कोरोना परिस्थिती निष्काळजीपणे हाताळल्याचा ठपका ठेवला आहे. पण यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत.

लसीकरणाबाबत केंद्राचा महाराष्ट्राशी दुजाभाव – राजेश टोपे
X

महाराष्ट्रामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसला असा गंभीर आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला आहे. पण या आरोपाला आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तर दिले. एवढेच नाही तर त्यांनी राज्य सरकारची भूमिकाही मांडली. कोरोनावरील लसीच्या बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप टोपे यांनी केला आहे.

यासाठी टोपे यांनी आकडेवारीदेखील दिली. आताच्या आकडेवारीनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी कोरोनावरील लसीचे फक्त साडे सात लाख डोस देण्यात आले आहेत. पण त्याचवेळी उत्तर प्रदेशला ४८ लाख डोस, म. प्रदेशला ४० लाख डोस, गुजरातला ३० लाख आणि हरियाणाला २४ लाख डोस वाटण्यात आल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. याचा अर्थ भाजपशासित राज्यांना जास्त ज्यादा डोस दिले जात आहेत असा होतो. यासंदर्भात आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी जादा डोस देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Updated : 8 April 2021 8:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top