Top
Home > News Update > पिकांचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती आहे हमीभाव?

पिकांचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती आहे हमीभाव?

पिकांचे हमीभाव जाहीर, कोणत्या पिकाला किती आहे हमीभाव?
X

भारत सरकारने आज खरीप हंगाम 2021-22 करिता पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. या हमीभावामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 3 ते 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मॅक्समहाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली.

या वाढलेले हमीभावामध्ये नाविन्य काहीच नाही. असं जावंधिया यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षीच्य़ा तुलनेत मक्याचे हमीभाव फक्त 20 रुपयांनी वाढवले आहेत. या वर्षी सर्वाधिक हमी भाव तुरीचा आणि उडिदाचा 300 रुपयांनी वाढवलेला आहे.

कापसाच्या हमीभावाचं काय?

गेल्यावर्षी कापसाला 5515 होते. यंदा कापसाच्या मध्यम धाग्याच्या कापसाचा हमीभाव 5,726 रुपये असणार आहे. म्हणजे 211 रुपयांनी मध्यम धाग्याच्या कापसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे लांब धाग्याच्या कापसामध्ये 5,0825 रुपयांवरुन 6025 रुपये करण्यात आला आहे म्हणजे 200 रुपयांनी कापसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे.

ज्वारीच्या हमी भावात 118 रुपयांनी वाढ केली आहे. तर धानाच्या भावात 72 रुपयांनी वाढ केल्ली आहे. तर बाजरीच्या हमीभावात 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर शेंगदान्याचा हमीभाव 275 रुपयांनी वाढवलेला आहे.

हे सर्व हमीभाव A2 + Fl या सुत्रांनी वाढवलेले आहेत. मात्र, काही ठिकाणी 52 टक्के नफा 60 टक्के नफा 70 टक्के नफा दाखवला आहे. तो A2 + FL वरच आहे. गेल्या वर्षीही तसाच आहे.

गेल्या वर्षभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मात्र, त्या प्रमाणे शेतमालाचे हमीभाव वाढताना दिसत नाहीत. अशी टीका विजय जावंधिया यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना केली.

कॉग्रेस च्या 70 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हमीभाव वाढला त्याच पद्धतीने भाजपच्या काळात देखील हमीभाव दिला आहे. कॉंग्रेसवर टीका करणार भाजपचं सरकार करत आहे.

MSP ला कोणतंही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळं गहू,ज्वारी,गहू, हरभऱ्याला हमीभाव मिळत नाही.

जी भाजप कॉंग्रेसवर टीका करत असते. त्या भाजपने देखील तेच केलं आहे.

सध्या डाळींना हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. मात्र, भारत सरकारने आयातीचा निर्णय घेतलेला आहे. 31 नोव्हेबरपर्यंत आयातीला परवानगी देण्यात आली. सुदैवाने देशात चांगला पाऊस झाला आणि उत्पन्न देखील चांगलं झालं तर जागतिक बाजारात डॉलरमध्ये भाव पडतील त्यावेळेला सरकार या हमीभावाचं संरक्षण करेल का? असा सवाल जावंधिया यांनी उपस्थित केला आहे. पाहा काय म्हटलं जावंधिया यांनी...

Updated : 9 Jun 2021 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top