Home > News Update > कोरोनाच्या वाढत्या प्रभावासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाचे सर्व राज्यांना आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रभावासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाचे सर्व राज्यांना आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रभावासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाचे सर्व राज्यांना आवाहन
X

2 वर्षांपूर्वी केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. त्यावेळी संपूर्ण जगात असंख्य लोकांच्या आरोग्यावर या विषाणूचा प्रभाव पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार करण्यात काही कंपन्यांना यश आल्यानंतर कोरोनाने संकट दूर झाल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विष्णुने संपूर्ण जगात प्रसार करण्यास सुरुवात केली असल्याचे आढळले असल्याने भारतीय आरोग्य व्यवस्थेवरील संकट वाढले असल्याचे पहायला मिळत आहे. या संदर्भात भारताच्या आरोग्य विभागाकडून एक ट्विट प्रसारित करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे विशेष विनंती केली आहे.

'अलीकडील काही देशांमध्ये COVID19 च्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विनंती केली आहे की नवीन प्रकाराचा मागोवा घेण्यासाठी सर्व #COVID19 पॉझिटिव्ह केसेसचे नमुने INSACOG लॅबमध्ये पाठवावेत. आरोग्य मंत्रालय आणि INSACOG परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.' अशा आशयाचा संदेश शेअर करत त्यासोबत आरोग्य विभागाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.

दरम्यान आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या या ट्विट सोबत एक पत्र जोडलेले आहे. या पत्रामध्ये आयएएस अधिकारी राजेश भूषण यांनी देशातील सर्व राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. या मध्ये प्रामुख्याने जगभरात दर आठवड्याला सुमारे 35 लाख लोक कोरोनाबधित होत आहेत. शिवाय भारतात देखील दर आठवड्याला सुमारे बाराशे नवे रुग्ण आढकत आहेत. याच पार्शवभूमीवर प्रत्येक राज्य सरकारने घ्यावी आशा काळजीचे संदेश दिले आहेत. शिवाय प्रत्येक राज्याने आता कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि सर्व सकारात्मक प्रकरणे, दररोज, नियुक्त केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज (IGSLS) कडे पाठवावेत अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, यापुढे राजेश भूषण यांनी 'आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय सर्वांनी केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे कौतुक करते. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि या संदर्भात सर्व राज्यांना आवश्यक पाठिंबा देत राहतील.' असे कौतुकोद्गार लिहिले आहेत


Updated : 21 Dec 2022 7:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top