Home > News Update > PFI यापुढे बेकायदेशीर संघटना, केंद्र सरकारचा निर्णय

PFI यापुढे बेकायदेशीर संघटना, केंद्र सरकारचा निर्णय

PFI यापुढे बेकायदेशीर संघटना, केंद्र सरकारचा निर्णय
X

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा छापेमारी करत असलेल्या नेत्यांची संघटना PFI महणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया ला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना म्हणुन घोषीत केले आहे. तब्बल ८ राज्यांमध्ये या संस्थेच्या नेत्य़ांवर हे छापे पडले होते.

पुढील पाच वर्षे PFI आणि या संस्थेशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांना ह निर्णय लागू असेल असा निर्णय केंद्र सरकारने काढला आहे. PFI ची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सीमी चे सदस्य आहेत अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. जमात उल मुजाहिद्दीन बांग्लादेश या संघटनेशी सीमीचे संबंध असल्याचे समोर आले आहे अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. शिवाय या दोन्ही संघटना या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहेत.

या संस्थांवरही आली बंदी

रिहॅब इंडिया फाउंडेशन,

ऑल इंडिया इमाम्स काउन्सिल,

नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन,

एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अॅण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ,

कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया,

ज्युनियर फ्रण्ट,

नॅशनल वुमन्स फ्रण्ट

Updated : 28 Sep 2022 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top