Home > News Update > हिवरे बाजार येथील शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त 'आनंदोत्सव' साजरा

हिवरे बाजार येथील शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त 'आनंदोत्सव' साजरा

हिवरे बाजार येथील शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आनंदोत्सव साजरा
X

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय बंद केले होते, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला होता. शासनाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक संसाधने नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते हीच गोष्ट लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे सर्वात शाळेची घंटा वाजली होती. आदर्श गाव हिवरे बाजारने कोरोनामुक्त गाव होण्याची किमया करणाऱ्या हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू होऊन आज 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्त आज 'आनंदोत्सव' साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना आदर्श गावचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटले आहे की, 15 जून रोजी राज्यात पहिल्यांदा हिवरे बाजार येथील शाळा सुरू झाली , कोरोना काळात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षकांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त 'आनंदोत्सव' तसेच भारताच्या स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव असा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो असं पवार म्हणाले.

Updated : 27 Sep 2021 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top