Home > News Update > #BipinRawat : हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत यांचे निधन

#BipinRawat : हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत यांचे निधन

#BipinRawat : हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत यांचे निधन
X

देशाच्या तिन्ही संरक्षणदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. हवाई दलाने रावत यांच्या निधनाची माहिती दिली आहे. रावत यांच्यासह १४ जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला दुपारी १२ वाजून २० तामिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यात अपघात झाला होता. या अपघातात हेलकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचेही या अपघातात निधन झाले आहे. या अपघातामधून ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे मात्र वाचले आहेत, त्यांच्यावर सध्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करुन जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे देशाचे नुकसान झाले आहे, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.


या हेलिकॉप्टरमधून सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि त्यांच्या स्टाफमधील इतर अधिकारी प्रवास करत होते. बिपीन रावत हे सुलूर इथल्या हवाई दलाच्या ठिकाणावरुन कुन्नूरमधील वेलिंग्टन इथे जाण्यासाठी निघाले होते. पण दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी त्यांचे हेलिकॉप्टर निलगिरी जिल्ह्यातील जंगल परिसरात कोसळले. या हेलिकॉप्टरला आग लागली होती. तिथल्या स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि हेलिकॉप्टरमधील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

Updated : 8 Dec 2021 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top