Home > News Update > नितेश राणेंनंतर निलेश राणे अडचणीत, सिंधुदुर्गमध्ये गुन्हा दाखल

नितेश राणेंनंतर निलेश राणे अडचणीत, सिंधुदुर्गमध्ये गुन्हा दाखल

नितेश राणेंनंतर निलेश राणे अडचणीत,  सिंधुदुर्गमध्ये गुन्हा दाखल
X

सिंधुदुर्गमधील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यातच आता त्यांचे भाऊ आणि माजी खासदार निलेश राणे हे देखील अडचणीत आले आहेत. निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांना शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे कोर्टापुढे शरण आल्यानंतर मंगळवारी कोर्टाने त्यांचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे कोर्टाबाहेर आले आणि आपल्या गाडीमधून निघाले असताना त्यांची गाडी पोलिसांनी अडवली होती. यानंतर नितेश आणि निलेश राणे यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. पण सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवस अटक न कऱण्याचे आदेश दिल्याने त्यांना अटक करता आली नाही. याच दरम्यान निलेश राणे यांनी पोलिसांना शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रकरणी निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांशी अर्वाच्च भाषेत वाद घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

निलेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी असतांनाही मंगळवारी ओरोस सत्र न्यायालयाच्या बाहेर आपल्या समर्थकांना जमवले. तसेच तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलेश राणे आणि त्यांच्या २५च्या आसपास समर्थकांनी शिवीगाळ केली, असा आरोप नाईक यांनी केला आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरुन प्रसारीत झाले असल्याचेही नाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करुन, निलेश नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत व शिवीगाळ केला म्हणून गुन्हा दाखल कऱण्याची मागणी, वैभव नाईक यांनी केली होती.

Updated : 2 Feb 2022 12:31 PM IST
Next Story
Share it
Top