Home > News Update > जेएनयू हल्ला – दिल्ली पोलिसांचा अजब कारभार; जखमी आएशी घोषवर गुन्हा

जेएनयू हल्ला – दिल्ली पोलिसांचा अजब कारभार; जखमी आएशी घोषवर गुन्हा

जेएनयू हल्ला – दिल्ली पोलिसांचा अजब कारभार; जखमी आएशी घोषवर गुन्हा
X

जेएनयू मध्ये (JNU) हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयूएसयू (JNUSU) ची अध्यक्ष आएशी घोष (Aeshi Ghosh) हिच्यासह काही जणांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ जानेवारीला जेएनयूच्या सर्व्हर रुमची तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आएशीसह १९ जणांवर ठेवण्यात आलाय.

संबंधित बातम्या...

जेएनयू प्रशासनाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) हा गुन्हा दाखल केलाय. जेएनयू प्रशासनानं ५ जानेवारीला ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ५ जानेरावीलाच रात्री विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला (JNU Attack) करण्यात आला, यात काही गुंडांनी हाता लाठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन मारहाण केली होती.

गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठामध्ये फी वाढीविरोधात आंदोलन सुरू आहे, विद्यार्थ्यांनी फी वाढीविरोधात आंदोलन केल्यानंतर प्रशासनानं माघार घेत फी वाढ रद्द केली होती. पण हॉस्टेल संदर्भातला निर्णय प्रशासनानं मागे न घेतल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय.

Updated : 7 Jan 2020 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top