Home > News Update > अकोले तालुक्यात गांज्याची शेती ; चार लाखांचा गांजा जप्त

अकोले तालुक्यात गांज्याची शेती ; चार लाखांचा गांजा जप्त

अकोले तालुक्यात गांज्याची शेती ; चार लाखांचा गांजा जप्त
X

अवैधरित्या गांजाची लागवड करुन तिची मशागत करुन जवळ बाळगणाऱ्यास अहमदनगरच्या अकोल तालुक्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल 3 लाख 64 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

अकोले तालुक्यातील मोग्रस गावच्या शिवारात शंकर काळू पारधी याने आपल्या वालवडीच्या शेताच्या बांधावर अवैधरित्या गांजाची लागवड करुन ती बाळगत असल्याची गोपनीय माहिती अकोेले पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची लहान मोठी झाडे जप्त केली आहे. तसेच गांज्याची लागवड आणि त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 9 Sep 2021 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top