Home > News Update > #FreedomConvoy2022: कोरोना निर्बंधांविरोधात उद्रेक, पंतप्रधानांवर लपून बसवण्याची वेळ

#FreedomConvoy2022: कोरोना निर्बंधांविरोधात उद्रेक, पंतप्रधानांवर लपून बसवण्याची वेळ

सरकारविरोधात जनतेचा उद्रेक झाला तर काय होते, याचा अनुभव सध्या एक देश घेत आहे. एवढेच नाही तर या देशाच्या पंतप्रधानांवर अज्ञात ठिकाणी लपून बसण्याची वेळ आली आहे.

#FreedomConvoy2022: कोरोना निर्बंधांविरोधात उद्रेक, पंतप्रधानांवर लपून बसवण्याची वेळ
X

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पण कॅनडामध्ये मात्र लसीकरण सक्तीचे करण्याच्या निर्णयाविरोधात आणि लॉकडाऊनविरोधात देशभरातील ट्रकचालकांनी तीव्र आंदोलन केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजधानी ओटावामध्ये तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त ट्रकचालकांनी पंतप्रधानांच्या निवासाला घेराव घातल्याने पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांना आपल्या कुटुंबासह अज्ञात ठिकाणी लपून बसण्याची वेळ आली आहे.

कॅनडामध्ये कोरोना लसीकरणाची सक्ती आणि लॉकडाऊनविरोधात हे ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रकचालकांनी आपल्या ट्रकसह रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्याने कॅनडामध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. जवळपास ७० किलोमीटर ट्रकची रांग तयार झाली असून या आंदोलकांनी या ट्रकच्या ताफ्याला Freedom Convoy 2022 असे नाव दिले आहे.

अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी कोरोना लसीकरण सक्तीचे करण्यात आल्याने ट्रकचालकांनी त्याला विरोध केला आहे. त्याचबरोबर पंतप्रझान जस्टीन ट्रुडो यांनी ट्रकचालकांबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने यामध्ये भर घातली आहे. "ट्रकचालक हे महत्त्वाचे नसलेले अल्पसंख्याक आहेत" असे वक्तव्य पंतप्रधान ट्रुडो यांनी केले होते. तसेच ट्रकचालकांना विज्ञान कळत नाही, ते स्वत:ला तर धोक्यात घालत आहेतच पण इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत, अशीही टीका ट्रुडो यांनी केली होती. त्यानंतर ट्रकचालकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. सध्या ओटावामध्ये रस्त्यांवर केवळ ट्रक दिसत आहेत.


एकीकडे ट्रकचालकांनी असे जोरदार आंदोलन सुरू केले आहे. त्यातच कोरोना निर्बंधांना विरोध करणाऱ्या इतर आंदोलकांचीही त्यांना साथ मिळाली आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती Ellen Mask यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ओटावामधील रस्त्यांवर महाकाय ट्रक थांबले असून ट्रकचालक सातत्याने हॉर्न वाजवून आपला संताप व्यक्त करत आहेत. काही ट्रक तर आता संसदेपर्यंतही पोहोचले आहेत.

Updated : 30 Jan 2022 10:33 AM IST
Next Story
Share it
Top