Home > Politics > हे 'व्हाईट वॉश' मंत्री मंडळ आहे का ? : यशोमती ठाकूर

हे 'व्हाईट वॉश' मंत्री मंडळ आहे का ? : यशोमती ठाकूर

हे व्हाईट वॉश मंत्री मंडळ आहे का ?  : यशोमती ठाकूर
X

हे 'व्हाईट वॉश' मंत्री मंडळ आहे का ? – यशोमती ठाकूर शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला आहे. पण या विस्तारावरुन आता विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना जाणीवपूर्वक डावलले गेले आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर शिंदे-फडणवीस सरकारचे हे 'व्हाईट वॉश' मंत्री मंडळ आहे का ? असा खोचक प्रश्नही यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.

क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पद यात्रेनिमिताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे 'व्हाईट वॉश' मंत्री मंडळ आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Updated : 9 Aug 2022 8:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top