Home > News Update > शासकीय व्यवहार आता काही अटींवर खासगी बॅंकांमध्ये

शासकीय व्यवहार आता काही अटींवर खासगी बॅंकांमध्ये

शासकीय व्यवहार आता काही अटींवर खासगी बॅंकांमध्ये, काय आहेत या अटी?

शासकीय व्यवहार आता काही अटींवर खासगी बॅंकांमध्ये
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शासकीय व्यवहार खासगी बँकेत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शासनाने काही नियम व अटी ठेवल्या आहेत.

यापूर्वी शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व महामंडळांकडील बँकींग व्यवहार केवळ राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्याचे ठरले आहे. याशिवाय आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन आणि भत्ते तसेच निवृत्ती वेतनधारकांचे बँक खाते याबाबतही राष्ट्रीयकृत बँकांना मान्यता देण्यात आली आहे.

तथापि, मर्यादित प्रमाणात खाजगी बँकांना देखील शासकीय बँकींग व्यवहार हाताळण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये विभागांना खासगी बँकांच्या मदतीने संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली व सेवा वापरता येईल. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या बँका आकारणार नाहीत, याची खात्री संबंधितानी करून घ्यावी लागेल.

वेतन व भत्त्यांसाठी असलेली कार्यालयीन बँक खाती शासन मान्यता देईल त्या खासगी बँकांमध्ये उघडता येतील. मात्र, वेतन व भत्त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही निधी यात जमा करता येणार नाही. तसेच निवृत्ती वेतनधारकांना स्वेच्छेने शासनाने मान्यता दिलेल्या कोणत्याही खासगी बँकेत निवृत्तीवेतन खाते उघडता येईल. खासगी बँकांना यासंदर्भात शासनाकडे स्वतंत्र करार करणे आवश्यक असून इच्छुक बँकांनी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत तसे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Updated : 21 Jan 2021 9:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top