Home > News Update > ३ कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, मंत्रिमंडळाची मंजुरी

३ कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, मंत्रिमंडळाची मंजुरी

३ कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू, मंत्रिमंडळाची मंजुरी
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातली माहिती दिली.

२९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. त्यानंतर संसदेमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली की मग हे कायदे रद्द होतील. या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला. गेल्या वर्षभरापासून सीमेवर शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. पण त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली. पण जोपर्यंत संसदेत कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Updated : 2021-11-24T17:02:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top