Home > News Update > खाद्यतेल, तेलबियांवर साठामर्यादा घालून शेतकऱ्यांची माती करायची आहे का? : सदाभाऊ खोत

खाद्यतेल, तेलबियांवर साठामर्यादा घालून शेतकऱ्यांची माती करायची आहे का? : सदाभाऊ खोत

खाद्यतेल, तेलबियांवर साठामर्यादा घालून शेतकऱ्यांची माती करायची आहे का? :  सदाभाऊ खोत
X

राज्यांना तेलाचा व तेलबियांचा साठा, वापराचा आढावा घेऊन मर्यादा घालण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी सर्व प्रकारच्या खाद्यतेल आणि तेलबियांवर ३१ मार्चपर्यंत म्हणजेच सहा महिन्यासाठी साठा मर्यादा लादली आहे. हंगामाच्या अगदी प्रारंभी आवश्यकता नसताना १२ लाख टन जनुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी, नंतर खाद्यतेल आयात शुल्कात कपात आणि आता साठामर्यादेच्या निर्णयामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. तरी राज्य सरकारने सोयाबीनवर कोणत्याही प्रकारचे स्टाँकलिमिट लावू नये अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

by putting stock limit does government wish to destroy farmer?

Updated : 12 Oct 2021 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top