Home > News Update > ग्वालियर: कामगारांनी भरलेली बस पलटली, 2 कामगारांचा जागीच मृत्यू

ग्वालियर: कामगारांनी भरलेली बस पलटली, 2 कामगारांचा जागीच मृत्यू

ग्वालियर: कामगारांनी भरलेली बस पलटली, 2 कामगारांचा जागीच मृत्यू
X

कोरोना व्हायरसची वाढती सख्या लक्षात घेता, अनेक लोक आता गावाकडे जात आहेत. दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं कामगारांच्या हातचं काम गेल्यानं लोक गावाकडं निघाले आहेत. दिल्लीतून कामगार आता गावाकडं जात आहेत. त्यातच लॉकडाऊन लावल्यानं रस्त्यावर वाहनांची संख्या कमी आहे. लोक पायी तसंच मिळेल त्या वाहनांमधून जात आहेत.

दिल्ली - ग्वालियर – बिलोआ या मार्गाने जाणाऱ्या बसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक कामगार असल्यानं ही बस जारौसी घाटी येथे रस्त्यावरच पलटली. 25 प्रवाश्यांची क्षमता असलेल्या या बसमध्ये 92 प्रवासी बसली होते. त्यामुळं झालेल्या या अपघातात दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.

सध्या गाडीच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढलं जात आहे. पाहा हा व्हिडीओ...

Updated : 20 April 2021 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top