Home > News Update > Buldana Bus Accident Help Line Number : समृद्धी महामार्गावर बसचा अपघात, प्रशासनाकडून मदतीसाठी विशेष कक्ष

Buldana Bus Accident Help Line Number : समृद्धी महामार्गावर बसचा अपघात, प्रशासनाकडून मदतीसाठी विशेष कक्ष

Buldana Bus Accident Help Line Number : समृद्धी महामार्गावर बसचा अपघात, प्रशासनाकडून मदतीसाठी विशेष कक्ष
X

समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर या बसमधून प्रवास करणाऱ्या नातेवाईकांना मदतीसाठी प्रशासनाने विशेष मदत कक्षाची स्थापना केली आहे. त्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

१ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा येथे रात्री दीडच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी जिल्हा मदत नियंत्रण कक्षाने 0712-2562668 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांना 8860018817 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


हे हि पहा...

Updated : 1 July 2023 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top