Home > News Update > फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 32 जणांची 18 कोटींची लूट

फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 32 जणांची 18 कोटींची लूट

फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 32 जणांची 18 कोटींची लूट
X

नवी मुंबईतील उलवे येथील सेक्टर १९ मध्ये एका बिल्डरने फ्लॅट विक्रीच्या नावाखाली ३२ जणांची कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उलवे सेक्टर 19 मधील बांधकाम व्यावसायिक मुस्तकीम शेख आणि त्यांचे दोन भागीदार कृष्णा सिंग आणि अश्विनी सिंग यांनी मिळून 32 जणांकडून एकूण 18 कोटी रुपये घेतले आणि फ्लॅटची खोटी कागदपत्रे दिली, अशी तक्रार काही लोकांनी केली आहे.

मुख्य आरोपी मुस्तकीम शेख बेपत्ता असून त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी मुस्तकीम शेखशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन बंद आल्याने लोकांचा संशय़ वाढला आणि त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी मुस्तकीम शेख अद्याप फरार आहे, फसवणूक झालेल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...

Updated : 9 Jan 2022 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top