Home > News Update > #Budget2022 : पासपोर्ट हरवल्यास चिंता नको, आता e-passport ची सोय

#Budget2022 : पासपोर्ट हरवल्यास चिंता नको, आता e-passport ची सोय

#Budget2022 :  पासपोर्ट हरवल्यास चिंता नको, आता e-passport ची सोय
X

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ९.२ टक्के विकासदाराचा दावा करत देशाचे बजेट सादर केले. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण त्याचबरोबर डिजिटल व्यवस्थेवर भर देत निर्मला सीतारामन यांनी e-passport घोषणा केली आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिक चीप असणारे पासपोर्ट २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून उपलब्ध होणार आहेत. पासपोर्टमध्ये असलेल्या चिपमध्ये बायोमेट्रिक डाटा असेल. e-passport हा नियमित पासपोर्टसारखाच असणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणेच e-passport मध्येही इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्यात आलेली असते. या चिपमध्ये प्रवाशाची संपूर्ण माहिती साठवलेली असेल. तसेच बायोमेट्रिक डेटा देखील असेल. या e-चिपमुळे पडताळणीची प्रक्रिया जलद होऊ शकेल. तसेच बनावट पासपोर्टला आळा बसेल असेही सरकारला वाटते आहे. सध्या पासपोर्टसाठीच्या कागदपत्र पडताळणीला बराच वेळ लागतो. त्यामुळे पासपोर्टसाठी अनेकांना बरीच प्रतिक्षा देखील करावी लागते. पण आता e- पासपोर्टमुळे वेळेची बचत होणार आहे. E-passport मुळे कागदपत्र पडताळणीचा काळ निम्म्याने कमी होईल, ई-पासपोर्टसाठीचा अर्जही नियमित पासपोर्टसारखाच असेल. त्यामुळे पासपोर्ट हरवण्याची चिंतासुद्धा संपणार आहे.

Updated : 1 Feb 2022 8:55 AM GMT
Next Story
Share it
Top