Home > News Update > इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटीच्या वतीने ऑस्ट्रेलियात साजरी झाली बुद्ध पौर्णिमा

इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटीच्या वतीने ऑस्ट्रेलियात साजरी झाली बुद्ध पौर्णिमा

इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटीच्या वतीने ऑस्ट्रेलियात साजरी झाली बुद्ध पौर्णिमा
X

ऑस्ट्रेलियातील इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटीच्या वतीने मेलबर्न शहरातील ब्रेब्रुक येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. ब्रेब्रुक येथील क्वांग मिन्ह बौद्ध मंदिरात हा सुंदर सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले क्वांग मिन्ह मंदिराचे मठाधिपती आणि व्हिक्टोरिया बौद्ध परिषदेचे अध्यक्ष थिच फुओक टॅन आणि भिक्षु संघातर्फे बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर भिक्षुं संघांना दान अर्पण करण्यात आले.

क्वांग मिन्ह या बौद्ध मंदिरात सिद्धार्थ गौतमाच्या प्रवासाचे वर्णन करणाऱ्या बुद्धाच्या मोठ मोठ्या सोन्याच्या मूर्ती आहेत. या बौद्ध मंदिरात हा विशेष सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी सोव्हिक्टोरिया राज्याचे संसद सदस्य आणि भारतीय वाणिज्य दूतावास तसेच मेलबर्नमधील मान्यवर उपस्थित होते. या विलोभनीय सोहळ्यास उपस्थित पाहुण्यांनी बुद्धाच्या जयंती निमित्त बहुसांस्कृतिक व्हिक्टोरिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये शुभेच्छा दिल्या. भारत, मलेशिया, श्रीलंकेतील ऑस्ट्रेलियात राहणारी अनेक बौद्ध कुटुंबे कार्यक्रमाला उपस्थित होते.

इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटीच्या संघाकडून श्रीमती सीमा टिपले यांनी बुद्धपूजा केली.

मास्टर दैविक आणि वंश पुणेकर यांनी सादर केलेल्या “बुद्ध आणि अंगुलीमाला” या स्किटमध्ये बुद्धाचा करुणा आणि दयाळूपणाचा संदेश उपस्थितांना दिला.

इंडियन बुद्धिस्ट कॉम्मुनिटीचे ऑस्ट्रेलियाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी या सुंदर सोहळ्याचे उत्तम आयोजन केले होते. बुद्धाचा मानवता, समता, शांतता आणि करुणेचा संदेश, बुद्धाच्या शिकवणींचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम इंडियन बुद्धिस्ट कम्युनिटी ही संस्था सातत्याने करत आहे.

Updated : 1 Jun 2023 1:19 PM GMT
Next Story
Share it
Top