Home > News Update > लोकसभा निवडणुकींसाठी बसपा सुप्रिमो मायावतींची एकला चलो रे ची घोषणा

लोकसभा निवडणुकींसाठी बसपा सुप्रिमो मायावतींची एकला चलो रे ची घोषणा

2024 ला पार पडणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरातून पराभूत करण्यासाठी राहुल गांधी इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व राजकीय पाक्षांची मूठ बांधत असतांना मायावती यांनी आघाडीला ठेंगा दाखवत लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकींसाठी बसपा सुप्रिमो मायावतींची एकला चलो रे ची घोषणा
X

2024 ला पार पडणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरातून पराभूत करण्यासाठी राहुल गांधी इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व राजकीय पाक्षांची मूठ बांधत असतांना मायावती यांनी आघाडीला ठेंगा दाखवत लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्माच्या नावाने लोकांना फसवून राजकारण केले जात आहे.

एकीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून मणिपूरच्या इंफाळ येथून सुरु झाली असून ते सामाजिक न्यायाची पार्श्वभूमी तयार करत दलित आदिवासी मुस्लिम व बहुजन समाजाच्या मताच राजकारण करताना दिसत आहेत. अशात बसपा सुप्रिमो मायावती यांनी भाजपा सारख्या बलाढ्य पक्षाला पराभूत करण्यासाठी आपल्या सोबत यावं अशी कॉंग्रेस च्या बढ्या नेत्यांची अपेक्षा होती. मात्र बसपाच्या प्रमुख इंडिया आघाडीला साथ न देता एकट्याने 2024 च्या लोकसभा निवडणूका एकट्यानेच लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतीने सोमवारी त्यांचा पक्षांच्या कार्यकर्त्यांना बंधू भावाने लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यास सांगितले आहे. आघाडी केल्याने बसपाची मते दुसऱ्या पार्टीना जातात परंतू त्यांची मते आपल्या पार्टीला ट्रान्सफर होत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. बसाच्या सुप्रिमो मायावतींनी समाजवादी पक्षासोबत भाजपावरही हल्लाबोल करतांना त्यांनी स्पष्ट स्वरुपात सांगितले आहे. आमच्या योजनांची नक्कल केली जात आहे. धर्माच्या नावाने लोकांना फसवून राजकारण केले जात आहे. मोफत राशन देऊन लोकांना गुलाम केले जात असल्याचे मायावतींनी भाजपावर टीका करताना म्हटले आहे. बेरोजगारी आणि महागाईवर सरकारचे लक्ष नाही. मायावतींनी लोकसभेच्या निवडणूकांच्या तयारीला लागण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

अखिलेश यादव यांच्या पासून सतर्क रहावे

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बसपा सुप्रिमो मायावती यांचा आज जन्मदिवस आहे. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना वाढदिसानिमित्त देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज पार पाडलेल्या पत्रकार परिषदेत मायावती यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर त्यांनी समजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव यांच्या जोरदार टिका केली आहे. त्यांनी यादव यांना सरड्यासारखा रंग बदलणारा असे म्हटले आहे. वास्तविक अखिलेश यांनी मायावतींना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. परंतू मायावतींना या शुभेच्छांना न स्वीकारता एका पार्टीच्या प्रमुखाने सरड्या सारखा रंग बदलत आपल्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बसपाच्या कार्यकर्त्यांनी सपा आणि अखिलेश यादव यांच्या पासून सतर्क रहावे असा सल्लाही मायावतींनी दिला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश माझ्याबद्दल खोटे आरोप करीत आहेत. अखिलेश पासून सावधान रहाण्याची गरज आहे. आघाडीचा लाभ घेण्यासाठी अखिलेश यांचे वक्तव्य समोर आले आहे. परंतू आम्हाला तर आघाडीमुळे जास्त नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीत सामील होणार नसल्याचे मायावतींनी म्हटले आहे.

Updated : 15 Jan 2024 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top